! मनोजदादा आमदार म्हणजे मी आमदार !
कराड उत्तरचे आमदार मा.मनोजदादा घोरपडे अशी दादांची ओळख आज महाराष्ट्र विधानसभेत आहे परंतु, एका तपाहून अधिकचा काळ दादांनी अथक परिश्रम,सातत्य आणि वैयक्तिक जीवनासाठीचा फार मोठा त्याग केल्याचे संपूर्ण कराड उत्तर मतदार संघ जाणून आहे. सन 2012 मध्ये मा. मनोजदादांच्या मातोश्री श्रीमती मंगलताई घोरपडे या जिल्हा परिषद सदस्या असताना मनोजदादांनी मतदार संघातील प्रत्येक गावात कौटुंबिक नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला .यावेळी, मा. मनोजदादांच्या नावापुढे कोणतेही पद नव्हते. असे असताना समाजाच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवायच्या, त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे, काम करत राहायचे फळाची अपेक्षा करायची नाही, एवढ्या लहानशा हेतूने दादांचा सामाजिक व राजकीय प्रवास सुरू झाला...... कष्टाचं फळ एक ना एक दिवस मिळणारच! हा नियतीचा नियम आहे...... आणि इथूनच दादांच्या संघर्षाची सुरुवात झाली.
सन 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मतदार संघातून मा.मनोजदादांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये कराड उत्तरची निवडणूक लढत पिढीजात, नेतृत्वाबरोबर दादांनी कडवी झुंज दिली. या निवडणुकीत अपयश आले तरी,कराड उत्तर मतदार संघाला सर्वसमावेशक, कल्पक,अभ्यासू,प्रयत्नवादी व प्रामाणिक नेतृत्व मिळाल्याची भावना जनतेत झाली.
"हरण्याची पर्वा कधी केली नाही,
जिंकण्याचा मोह ही कधी झाला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच,
पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.
या उक्तीप्रमाणे, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे खचून न जाता जनसेवेचे व्रत स्वीकारून दादांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. सन 2017 साली, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये वर्णे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक जिंकून मनोजदादांनी सातारा जिल्हा परिषदेत दिमाखात एन्ट्री केली. जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे,पायाभूत सुविधा,शिक्षण विषयक कामे करत असताना मनोजदादांनी प्रत्येक लहान-मोठ्या गावांत दांडगा जनसंपर्क निर्माण केला. गावागावातील पोरांपासून थोरांपर्यंत मनोजदादा म्हणजे आपल्या हक्काचा माणूस वाटू लागले. सातारा जिल्हा परिषदेत देखील सक्षम व अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य म्हणून दादांची ओळख निर्माण झाली. त्यांच्या या कार्याची दखल घेत,भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून काम करण्याची देखील संधी मिळाली. आता मनोजदादा घोरपडे हे नाव केवळ वर्णे जिल्हा परिषद गट किंवा सातारा तालुक्यातपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण जिल्हाभर दादांनी स्वतःच्या कामातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. जनतेच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या व जनतेसाठी सदैव उपलब्ध होणाऱ्या या नेतृत्वाला कराड उत्तर मतदार संघ पुन्हा एकदा खुणावत होता. यातूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर च्या जनसेवेसाठी पुन्हा एकदा स्वतःला आजमावण्याचा निर्णय मनोजदादांनी घेतला. या वेळची निवडणूक अपक्ष लढवत असताना पुन्हा एकदा मनोजदादांना अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु,मतदार संघात चंगली मते घेतल्याने मनोजदादा हेच कराड उत्तरचे लोकप्रिय नेतृत्व असल्याचं सिद्ध झालं. मनोजदादांचा हा प्रवास इथेच थांबत नाही. 2019 च्या निवडणूक निकालानंतर मनोजदादा दुसऱ्याच दिवशी एका कार्यकर्त्याच्या घरातील दुःखद प्रसंगी सहभागी होते. कराड उत्तर मतदार संघात पुन्हा एकदा मनोजदादा नव्या जोमाने व तयारीने कामाला लागले. सामाजिक व विकासात्मक कामाबरोबरच येथील सर्वसामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला चालना देणे गरजेचे आहे,हे ओळखून साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न दादांनी मनाशी बाळगले. खटाव माण साखर कारखान्याची उभारणी केली. खटाव माण साखर कारखान्याच्या को-चेअरमन पदाची जबाबदारी स्वीकारली.
मनोजदादांचे बंधू मा. संग्राम घोरपडे व विक्रमनाना यांच्या जोडीने खटावच्या उजाड माळरानात साखर कारखाना उभारणीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. आमदार मनोजदादांची सावली म्हणून ओळखले जाणारे मा.संग्राम घोरपडे, हे खटाव-माण साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कामकाज पाहत आहेत. खटाव माण साखर कारखान्याचा यशस्वी व चढता आलेख पाहिल्यानंतर मा.दादाच्या कार्याचा व कल्पकतेचा निश्चितच अभिमान वाटतो.सातारा एम. आय. डी. सी. मध्ये दोन कारखाने, राज्यात व बाहेर सोलर प्रोजेक्ट्स उभारून हजारो रोजगार उपलब्ध केले. दरम्यानच्या काळात मनोजदादांची कराड उत्तरेत दिवसेंदिवस लोकप्रियता वाढू लागली होती. परंतु संघर्ष, समस्या आणि अडचणी काही थांबत नव्हत्या किंबहुना त्या निर्माण केल्या जात होत्या. साखर कारखान्याच्या बाबतीत घडलेला दुर्दैवी प्रसंग आणि त्या भोवती तयार केलेले चक्रव्यूवरूपी षडयंत्र भेदण्याचे आव्हान दादांसमोर उभे होते. संयम, धैर्य व धीरोदत्ताची भूमिका घेत मनोजदादांनी हे चक्रव्यूह भेदले.
"अनंत आमुची ध्येयासक्ती,
अनंत अन आशा,
किनारा तुला पामराला."
The show must go on, पुन्हा नव्याने सुरुवात करत, मनोजदादा कराड उत्तरेच्या मैदानात उतरले. कराड उत्तर मतदार संघातील गाव नि गाव, वाडी-वस्ती, वार्ड न वार्ड,प्रत्येक कार्यकर्ता, मतदार यांच्याशी वैयक्तिक संपर्क ठेवून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. लोकांच्या समस्या लक्षात घेतल्या. वेळीच योग्य ते उपाय शोधले. कायमस्वरूपीची कामे,तात्पुरती करता येण्यासारखी कामे अशा सर्व स्तरांवरील नियोजनातून लोकांमध्ये विश्वासार्हता निर्माण केली. सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे कराड उत्तर मध्ये 'मनोजदादा आमदार म्हणजे मीच आमदार' असे घोषवाक्य बनवून मतदारांनी स्वतः ही निवडणूक हातात घेतली. त्याचप्रमाणे समस्त कराड उत्तर मधील माता भगिनीनी घरोघरी जाऊन आपल्या लाडक्या भावासाठी प्रचार केला या सर्वांचाच परिपाक म्हणजे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,महायुतीतील घटक पक्ष, अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट, आमदार, खासदार व प्रस्तापित यांच्या विरोधातील सर्व हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने मा. मनोजदादा घोरपडे यांनी कराड उत्तर मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे कमळ सर्वप्रथम फुलवले आणि कराड उत्तर च्या जनतेने, मनोजदादा या नावापुढे आमदार हे नाव जोडले व इथूनच कराड उत्तर मतदारसंघात सुरू झाले एक नवे पर्व- "मनोजपर्व"
मनोजदादा आमदार झाले आणि अपेक्षेप्रमाणे जनसेवेसाठी जनतेत रुजू झाले. सर्वप्रथम, दादांनी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे ठरवले.त्यानुसार, तारळी लिंक कॅनॉल चालू करून कोपर्डे हवेली, मसूर,परिसरातील गावे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त केली. हणबरवाडी-धनगरवाडी योजना टप्पा क्र.1 व 2 चालू केला. तसेच हणबरवाडी टप्पा क्रमांक दोन सु.प्र.मा. अन्वये शंभर कोटी मंजूर करण्यासाठी दादांनी भगीरथ प्रयत्न केले आहेत. याशिवाय,इंदोली- पाल उपसा सिंचन योजनेचे पाणी आरक्षित करून सर्वेक्षण चालू केले. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास 60 लाख मंजूर यासारखे प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. समर्थगाव /काशीळ उपसा सिंचन व गणेशवाडी उपसा सिंचन योजनांमुळे अनेक गावांच्या पिण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लावण्यामध्ये यश आले आहे. गणेशवाडी चे 25 कोटी चे ट्रेंडर काढले आहे. व पुढील काळात अनेक गावांच्या पिण्याच्या व शेतीविषयक पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे. उंब्रज येथील पारदर्शक पुलासाठी 210 कोटी रुपये मंजूर करून लवकरच हे काम सुरू होत आहे. ग्रामीण अंतर्गत रस्ते,सभामंडप, रस्त्यांवरील पूल, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार एसटी बसेस ची सुविधा अशा कितीतरी सोयी व सुविधा पुरविण्यासाठी चे नियोजन व प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे काम सद्यस्थितीत कराड उत्तर मतदार संघात चालू असल्याचे दिसत आहे. दूरदृष्टी असणारा दृष्टा, अभ्यासू व संवेदनशील नेता म्हणून आमदार मनोज दादा घोरपडे हे नावारूपाला येत आहेत.
आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिरे, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिर, बांधकाम मजूर व गरजूंना साहित्य वाटप याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, कुस्त्यांचे आखाडे, बैलगाडा शर्यती इ. आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा या सर्वच क्षेत्रात आमदार मनोजदादांकडून सध्या मतदारसंघात विकासकामांची घोडदौड चौफेर सुरू आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून सर्व सामान्यांच्या समस्या डायरेक्ट सोडवल्या जातात. आमदार मनोजदादांच्या या संघर्षमय प्रवासात खऱ्या अर्थाने ज्यांनी अतुलनीय बंधू प्रेमाचा आदर्श निर्माण केला ते म्हणजे त्यांचे बंधू संग्राम (बापू) घोरपडे, विक्रम (नाना )घोरपडे, त्याचबरोबर दादांच्या मातोश्री मंगलताई घोरपडे, मनोजदादांच्या सौभाग्यवती समताताई घोरपडे, वहिनी तेजस्विनी घोरपडे श्री कृष्णत शेडगे (मामा), या सर्वांची साथ व त्यागाचे मोल नाही.
Join me in our journey of creating a Viksit Bharat.
Click Here to contribute Now
Namo App